महिलेवर चाकु हल्ला
नाशिक: दुसर्याकडे पैसे काम मागतेस अशी विचारणा करत एकाने महिलेवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री म्हसरूळ – मखमलाबाद लिंकरोडवर घडली. तक्षिल रमेश आहिरे (२५, रा. अनंत सागर रो हाऊस, सावरकरनगर, सातपुर) असे हल्ला करणार्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अहिरे याने शनिवारी रात्री पीडितेस त्याच्या बलेनो कारमध्ये बसवून घेतले. यावेळी तु दुसर्याकडे पैसे का मागतेस अशी विचारणा करत अचानक चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक भडीकर करत आहेत.
…..
टोळक्याची कुटुंबियांना मारहाण
नाशिक: जुनी कुरापत काढून चौघांच्या टोळक्याने कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर गावात घडली.नंदु भाऊसाहेब मधे , लक्ष्मण भाऊसाहेब मधे, शुभम रंगनाथ मधे , सोमनाथ रघुनाथ झांझर (रा. सर्व कोळीवाडा, गंगापूर) अशी मारहाण करणार्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मनु संजय कटारे (रा. गंगापूर) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शनिवारी कटारे घरी येत असताना संशयितांनी त्यास आडवून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्याची आई व बहिण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली. तसेच कोयत्याने उलट्या बाजुने मारहाण केली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक आर. डी. सोळसे करत आहेत.
…..
जुन्या कुरापतीतून चाकूने वार
नाशिक: जुन्या भांडणाची कुरापत काढून सराईतासह टोळक्याने एकावर चाकूने हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची घटना देवळाली गावातील मालधक्का परिसरात शनिवारी साडेआठ वाजता घडली. सिद्धार्थ धनेधर, दर्शन भालेराव, बंटी पाटील, निरज जाधव (रा. सर्व मालधक्का, देवळाली गाव) अशी मारहाण करणार्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी भिकन आब्बास मन्सुरी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून चाकूने मन्सुरी यांच्यावर हल्ला चढवत गंभीर जखमी केली यावेळी त्यांना वाचवण्यासाठी आलेले त्यांचे बंधु व मुलासही संशयितांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…..