नाशिक- महिलेचा विनयभंग करणार्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांनी २ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. लक्ष्मण मनीराम देवरे (४३, रा. मयुर पार्क, शिव कॉलनी, सातपूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ३ ऑगस्ट २०१७ मध्ये घडली होती. देवरे याने सदर दिवशी महिलेस तीच्या घराजवळील रस्त्यावर आडवून अश्लिल भाषेत संभाषण करून तीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडितेने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून देवरे यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महिला पोलीस उपनिरिक्षक एस. ए. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून सबळ पुरावे गोळा केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाच अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांच्या न्यायालयात सुरू होता. उपलब्ध सबळ पुराव्यांवरून दोष सिद्ध झाल्याने त्यांनी आरोपी देवरे यास दोन वर्ष सक्त मजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकिल म्हणुन अॅड. सुषमा बंगले यांनी काम पाहिले.