नाशिक – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्या वतीने ८ लाख ३४ हजार रुपये किंमतीची थार या श्रेणीतील गाडी देणगी स्वरुपात भेट दिली. याप्रसंगी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सीईओ विजय नाकारा यांनी संस्थानचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे सदर गाडीची चावी सुपूर्द केली.
यावेळी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाचे नासिक विभागाचे प्रमुख प्रदिप देशमुख,जे.एस.प्रसाद, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, वाहन विभाग प्रमुख प्रकाश क्षिरसागर, समाजिक कार्यकर्ते अनिल त्रिभुवन,मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.
विधिवत पूजा करण्यात आली
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्या वतीने यापुर्वी व्हायोजर, बोलेरो, स्कॉर्पिओ, कॅम्पर, लोगान, झायलो, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्टर), एक्स यु व्ही ५००, एक्स यु व्ही ३००, मराझो अशा विविध श्रेणीतील एकुण १४ वाहने देणगी स्वरुपात दिलेल्या आहेत. आज महिद्रा थार या श्रेणीतील ८ लाख ३४ हजार रुपये किंमतीची गाडी देणगी स्वरुपात दिली. या गाडीची संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाचे सी.ई.ओ. विजय नाकारा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी नाशिक महिंद्र अॅण्ड महिंद्र कंंपनीचे अधीकारी सुशील नांबीयार आदी उपस्थित होते .