नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाकिर नाईक यांची माहिती कोणतेही संदर्भात नाही. मात्र अशी माहिती दुस-या संकेतस्थळावर असल्याचे निदर्शनास येते ते संकेतस्थळ तातडीने बंद करण्यात यावे अशी तक्रार विद्यापीठातर्फे सायबर सेलकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये जाकिर नाईक यांचे नांव यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत असल्याबाबत सदर नाव संकेतस्थळावरुन तात्काळ हटविण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे वृत्त विविध प्रसार माध्यमांवर प्रसिध्द झाले आहेत.
याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अशा प्रकारची जाकिर नाईक बाबत कोणतीही माहिती महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. विद्यापीठातर्फे इंटनेरटवर अशा प्रकारची माहिती इतरत्र कोणत्या संकेतस्थळावर असल्याचा शोध घेतला असता c96a0cl.givery.club या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रसिध्द असून सदर संकेतस्थळ तातडीने बंद करण्याबाबत विद्यापीठाकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.