नाशिक – स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची नियुक्ती महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. या नवीन सदस्यात भाजपचे ८, शिवसेनेचे ५ व काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी एक सदस्य आहे. असे एकुण १६ सदस्य यात असणार आहे.
भाजप – इंदुमती नागरे, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर, गणेश गीते, योगेश हिरे, हिमगौरी आहेर, मुकेश शहाणे, रंजना भानसी
शिवसेना – ज्योती खोले, रत्नमाला राणे, केशव पोरजे, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर
मनसे – सलीम शेख
काँग्रेस – राहुल दिवे
राष्ट्रवादी – समीना मेमन
निवडीत राजकारण
भाजपचे महापौर सतीश कुलकर्णी यावेळी धक्कातंत्राचा वापर केला. त्यामुळेच केवळ नव्या ८ सदस्यांऐवजी महापौरांनी संपूर्ण १६ नावांची घोषणा केली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.