मुंबई – आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भगवा फडकवा असे निर्देश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. माजी आमदार वसंत गीते आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या दोन्ही नेत्यांमुळे नाशिकमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले असून आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड राहणार आहे. तसेच, आगामी काळात या दोन्ही नेत्यांचे असंख्य कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.