नाशिक – महापालिकेची सर्वसाधारण महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. त्यात ४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ते पुढील प्रमाणे
१. देवळाली गाव येथील टीडीआर घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात गुंतलेल्यांना चांगलाच झटका बसला आहे.
२. मुस्लिम कब्रस्तानचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे या कब्रस्तानसाठी जुने नाशिकमध्ये भूसंपादन करण्यासाठीच्या निधीच्या मंजुरीला महासभेत मान्यता देण्यात आली.
३. सिडको परिसरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून बाधित झाला आहे. त्याची दखल घेत शिवसेना नगरसेवकांनी महासभेच्या प्रारंभीच आंदोलन केले. त्याची दखल घेत याप्रश्नी मंगळवारी (८ डिसेंबर) तातडीने बैठक घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. या बैठकीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाबाबत चर्चा केली जाणार आहे.
४. बिटको हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक निधीच्या मंजुरीला महासभेने हिरवा कंदिल दिला आहे.