नाशिक – राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी मान्य करत नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे. तशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रविण (बंटी) तिदमे यांनी दोन महिने अगोदरच इंडिया दर्पण लाईव्हला दिली होती. ती बातमी आता खरी ठरली आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने नाशिक आयुक्तांना पत्र पाठवून पाठवलेल्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यात काही अटी दिल्या असून ते पत्र खालील प्रमाणे आहे…