नाशिक – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला खंबीर नेतृत्व दिले असल्याने लोक शिवसेनेकडे मोठया आशेने बघत आहेत. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकांतही शिवसेनेचाच झंझावात दिसेल.त्यामुळेच नाशिक महापालिका सर्वाधिक जागांसह आम्ही निश्चितच सत्ता काबीज करू शकतो याची खूणगाठ बाळगून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामास लागावे,असे कळकळीचे आवाहन शिवसेनेचे नूतन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. व्यासपीठावर माजी महापौर विनायक पांडे, योगेश बेलदार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख योगेश म्हस्के आदी होते.
महानगरप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बडगुजर यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित उपविभागप्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी किशोर निकम,निलेश कर्डिले, प्रमोद शिंदे धनंजय डोळस सचिन हेकरे, सागर निकाळे,राहुल देशमुख, सुनील मौले,अशोक जाधव,लखन कुमावत,शिखर पवार, किशोर निकम,यशवंत पवार, लखन विश्वकर्मा, शरद चव्हाण संजय चिंचोरे,राकेश साळुंके, निशांत काकड,शंकर लोखंडे,कैलास जाधव, अजय काकडे, सचिन अरिंगळे, सागर भोर,दिनेश सूर्यवंशी, कुळदीप आढाव,सचिन धोंडगे,बबलू साबळे, दीपक तावरे,उमेश शिंदे आदी उपविभाग प्रमुख उपस्थित होते.
नाशिक महानगर आणि नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना विविध उपक्रम राबवून जनतेशी सुसंवाद साधत आहे. २०१७ च्या निवडणुकीत आपण सर्वस्व पणास लावले परंतु आपण एकहाती सत्तेपर्यंत पोहोचू शकलो नाही. परंतु यावेळी परिस्थिती बदलली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामकाजावर लोक नाराज आहेत.जनतेला परिवर्तन हवे आहे. त्यामुळेच या संधीचा फायदा उठवून भाजपाला सत्तेवरून खाली खेचणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिकांनी कामाला लागावे, असेही बडगुजर यांनी पुढे सांगितले. निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षातर्फे आदर बाळगला जातो त्यामुळे तन-मन-धनाने कामास लागून शिवसेनेचे विचार आणि योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी सर्वांनीच कंबर कसावी, असेही बडगुजर म्हणाले.