नाशिक पश्चिमसाठी जगन पाटील, नाशिक मध्य पवन भगूरकर तर पूर्वसाठी सुनिल केदार यांची नियुक्ती
नाशिक – नाशिक महानगर भाजपचे तीन विधानसभेचे प्रभारी जाहीर केले आहेत. नाशिक पश्चिम विधानसभेसाठी जगन पाटील, नाशिक मध्य विधानसभेसाठी पवन भगूरकर, तर नाशिक पूर्व विधानसभेसाठी सुनिल केदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड जाहीर केली आहे.
बुथ रचना सक्षम करणे, मंडल व शहर पदाधिकारी तसेच विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे आमदार यांच्याशी समन्वय साधणे, मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी त्या त्या मंडलातील पदाधिकाऱ्यांना सहकार्य करणे, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, आमदार, खासदार व शहर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय भूमिका विधानसभा प्रभारी योग्य प्रकारे पार पाडता यावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन भाजप नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे यांनी या प्रभारी पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
शहर पदाधिकारी व विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे आमदार यांचेशी समन्वय साधने,मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी,तसेच पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठीच्या कल्याणकारी योजना जनसामान्यापर्यंत पोहचवून या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी,यासारखे उद्देश डोळ्यापुढे ठेऊन या नियुक्त्या केल्या आहेत.
पूर्व विधानसभा मतदार संघात नाशिकरोड मंडल,पंचवटी मंडल, तपोवन मंडल व देवळाली भगूर मंडलाच्या काही भागाचे प्रभारी सुनील केदार, मध्य विधानसभेतील मध्य नाशिक मंडल, जुने नाशिक मंडल व द्वारका मंडलाचे प्रभारी पवन भगूरकर तर पश्चिम विधानसभा मतदार संघात सातपूर मंडल, सिडको-१ मंडल,सिडको-२ मंडल व सातपूर मंडल येतात. या सर्व भागाचे प्रभारी जगन पाटील असतील.
या तिन्ही निवडीचे प्रदेश भाजप सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्षा खासदार डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, प्रदेश पॅनलिस्ट लक्ष्मण सावजी, महापौर सतीश कुलकर्णी, ज्येष्ठ नेते विजय साने व प्रा. सुहास फरांदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील बागुल व वसंत गिते, नाशिक महानगर भाजप संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव,कोषाध्यक्ष आशिष नहार, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे,भाजप मनपा सभागृह नेते सतीश सोनवणे,स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते,गटनेते जगदीश पाटील ,भाजप प्रदेश उद्योग आघाडी सयोंजाक प्रदीप पेशकार, महिला आघाडी अध्यक्षा-हीमगौरी आडके,सर्व मंडलांचे अध्यक्ष अनुक्रमे हेमंत गायकवाड,ज्ञानेश्वर काकड, चंद्रशेखर पंचाक्षरी,भास्करराव घोडेकर,सुनील देसाई,देवदत्त जोशी,अविनाश पाटील,शिवाजी बरके,अमोल इघे तसेच प्रदेश पदाधिकारी,भाजप लोकप्रतिनिधी,भाजप शहर पदाधिकारी,आघाड्यांचे संयोजक व पदाधिकारी,मंडलातील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या निवडीचे उत्स्फूर्तपणे अभिनंदन केले आहे.