नाशिक – नाशिक महानगरपालिकाच्या निवडणुका एकत्र लढवण्याचे सुतोवाच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना दिले. ते म्हणाले की राज्यपातळीवर हा निर्णय होईल. तीन पक्ष एकत्र येत असले तरी कोणी कोणती जागा लढवायची हे ठरवावे लागणार आहे. एकत्र येण्यास अडचण आल्यास स्वतंत्र निवडणूक लढवता येईल. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येता येतील. जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत सर्व जागा लढण्याची तयारी सर्वच पक्षांना ठेवावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर भुजबळांना याबाबत विचारल्यानंतर त्यांनी याबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.