नाशिक – नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. हे साहित्य संमेलन नाशिककरांचे दृष्टीने महत्वाचे असल्याने संमेलन शांततेत व निर्विग्न पार पडावे यासाठी नाशिक महानगर पालिका सर्वोतोपरी सहकार्य करेल असे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी सांगितले.
आज संमेलनाचे कार्यालयात आयडिया वस्तू विशारद विद्यालयाच्या विध्यार्थी यांनी आर्किटेक दिनेश जातेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या रचना आराखड्याचे दूरदृष्यं माध्यमाद्वारे सादरीकरण दिले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नोडल अधिकारी नितीन मुंडावरे, आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत खाडे , श्री प्रशांत वाघमारे, पोलीस उपयुक्त नवलनाथ तांबे, माधवी वाघ, जयप्रकाश जातेगावकर, भगवान हिरे, चंद्रकांत दीक्षित, संजय करंजकर, दिलीप साळवेकर,सुभाष पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुंडावरे यांनी सांगितले की, २३ मार्च रोजी सर्व यंत्रणा कार्यरत होतील, त्याचे प्रात्यक्षिक घेतले जाईल, तसेच डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, अग्निशामक दलाचे कर्मचारी तीन दिवस २४ तास उपलब्ध असतील. हॉस्पिटल मध्ये ५ बेड राखीव ठेवण्यात येतील. हे संमेलन निर्विघ्न संपन्न पार पडेल यासाठी सर्व काळजी घेतली जाईल . सुरवातीस जयप्रकाश जातेगावकर यांनी स्वागत केले, शेवटी आभार व्यक्त केले.