नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी जाहीर झालेल्या आगामी नगर पंचायत निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिपचंद्रजी पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर यांनी निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
निफाड तालुक्यातील नगर पंचायती निवडणुकांसाठी विक्रम कदम, प्रकाश (बंटी) कोरडे व प्रमोद साखरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कळवण तालुक्यातील नगर पंचायती निवडणुकांसाठी संदीप भवर, अरुण दातीर, अक्षय खांडरे व सौरभ सोनवणे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दिंडोरी तालुक्यातील नगर पंचायती निवडणुकांसाठी मनोज घोडके, नितीन साळवे, कौशल (बब्बू) पाटील, जावेद शेख व तुषार भंदुरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पेठ तालुक्यातील नगर पंचायती निवडणुकांसाठी नामदेवराव पाटील, खंडू बोडके व भाऊसाहेब निमसे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चांदवड तालुक्यातील निवडणुकांसाठी पराग शिंत्रे, किशोर जाचक व संतोष पिल्ले यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.