नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी जिल्हा संघटक म्हणून निशांत राजेंद्र जाधव यांची नियुक्ती केली आहे.जिल्हा मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी जाधव यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिपचंद्रजी पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर व शहराध्यक्ष अंकुश पवार, रोजगार विभागाचे प्रदेश सरचिटणीस सनी अंबोरे, राज्य प्रसार, प्रसिद्धी प्रमुख वासुदेव नार्वेकर रोजगार विभागाचे अंधेरी-वर्सोवा विभाग संघटक संदीप पाटील, जोगेश्वरी पूर्व विभाग उपाध्यक्ष ओमकार कसबेकर, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, कामगार सेना प्रदेश उपचिटणीस कैलास मोरे व सागर कोठावदे, सचिन भोसले, किशोर वडजे, राम बिडवे, निलेश पानसरे, गणेश कदम, निलेश सहाणे, सिद्धेश सानप, सौरभ सोनवणे आदि पदाधिकारी व मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








