नाशिक – नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक येत्या ९ मार्च रोजी होणार आहे. स्थायी समितीचे एकूण १६ सदस्य असून सभापतीपदासाठी सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र, शिवसेनेनेही सभापतीपदाचा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा भाजपचा प्रयत्न आहे.
बलाबल असे
भाजपचे ८, शिवसेनेचे ५ व काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी एक सदस्य आहे.
भाजप – इंदुमती नागरे, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर, गणेश गीते, योगेश हिरे, हिमगौरी आहेर, मुकेश शहाणे, रंजना भानसी
शिवसेना – ज्योती खोले, रत्नमाला राणे, केशव पोरजे, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर
मनसे – सलीम शेख
काँग्रेस – राहुल दिवे
राष्ट्रवादी – समीना मेमन