नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या संगीता गायकवाड तर उपसभापतीपदी शाहीन मिर्झा यांची निवड झाली. या पदासााठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थीतीत बैठक झाली. त्यात ही निवड झाली.
या निवडणुकीत शिवसेनेच्या ज्योती खोले यांनी दोन्ही पदासाठी अर्ज केले होते. त्यात त्यांनी १५ मिनीटाच्या माघारीच्या वेळेत उपसभापतीपदासाठी माघार घेतली. पण, सभापतीपदासाठी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे या पदासाठी निवडणूक झाली. त्यात संगीता गायकवाड यांना ५ तर खोले यांना स्वत.चे एक मत पडले. उपसभापतीपदासाठी निवडणूक बिनविरोध झाली. त्यात मिर्झा यांची वर्णी लागली.