नाशिक – आगामी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दत्तु दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग बैठका सुरु झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पूर्व नाशिक (पंचवटी) विभागाच्या प्रभाग क्रमांक ४, ५ व ६ च्या बैठका संपन्न झाल्या.
खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या बैठकीत पदाधिका-यांनी विभागाच्या प्रभाग क्रमांक ४,५ व ६ मधील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच संघटना बांधणी व आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीं विषयी मार्गदर्शन केले. या बैठकीत पंचवटी विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्ष पद्मिनीताई वारे, शहराध्यक्षा अरुणाताई पाटील, मनसे नगरसेविका गटनेत्या सौ. नंदिनीताई बोडके, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, मिलिंद गोसावी, श्रीराम कोठुळे, नवनाथ जाधव, मनसे रस्ते आस्थापना सेनेचे अभिजीत गोसावी, खंडू बोडके, मुक्ताताई इंगळे, कल्पना जाधव, गोपी पगार, अजिंक्य बोडके, भीमा लिलके या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.