नाशिक – महापालिका कर्मचाऱ्यांना येत्या १ एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. मनपा प्रशासनाने त्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालीही बैठक झाली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश भुजबळांनी दिले होते. त्यानंतर आता मनपा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही सुरू केली आहे. महापालिकेच्या ४ हजार ७०० कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
दरम्यान, वेतन आयोग लागू झाल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर १२५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.