नाशिक – महानगरपालिका आयु्क्त कैलास जाधव यांच्या पत्नीचा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. पण, आय़ुक्तांचा स्वतःचाअहवाल निगेटीव्ह आलेला आहे. पण, खबरदारी म्हणून त्यांनी घरुनचा कामकाज करण्याचा निर्णय़ घेतला आहे. सर्व प्रकारची दक्षता घेऊन कोरोनाचे नियम पाळून सोशल डिस्टनसिंग ठेवून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न सुरु आहे. गेल्या काही दिवसात आयुक्त जाधव यांनी सुध्दा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन उपाययोजना करण्यासाठी सतत प्रयत्न केले. आता ते काही दिवस व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे.