नाशिक – महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज नाशिककरांशी संवाद साधला. गेल्या काही आठवड्यात नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षणीयरित्या वाढला आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी कोरोनाची सद्यस्थिती, महापालिकेची उपाययोजना आदींबाबत माहिती दिली.
महापालिका आयुक्त म्हणाले की,
-
आता पाच आठवड्यात दहा पट होतेय संख्या
-
नियम पाळावे, जबाबदार नाशिककर हे दाखवून द्यावे
-
शनिवार आणि रविवार हॉटेलला गर्दी करु नका
-
आपण सर्वांसमोर आदर्श निर्माण करु या
-
नाशिक बाझार हे अॅप डाऊनलोड करा. किराणा, भाजीपाला, दूध व अत्यावश्यक सेवा मिळतील. सेवा, गुणवत्ता आणि दर्जा मिळाल्यानंतर पैसे द्या.
-
फास्ट फूडच्या ठिकाणी जास्त गर्दी करु नका
-
स्वतःला शिस्त लावूया. कुटुंबाची काळजी करु या. मास्क लावा. सॅनिटायझरची बाटली सोबत ठेवा.
-
महापालिका प्रशासन सर्वतोपरी तयारी करीत आहे
-
आपण सर्व मिळून ही लढाई जिंकू या
https://www.facebook.com/mynashikmc/videos/447376026473721/