नाशिक – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. नाशिकमधील एकूण कोरोना बाधितांपैकी ८० टक्के बाधित हे नाशिक शहरातील आहेत. त्यामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. याचीच दखल घेत महापालिका आयुक्त कैलास जाधव हे फेसबुकद्वारे नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. २० मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता ते फेसबुक लाईव्हद्वारे नाशिककरांना कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती देणार आहेत.
गेल्या वर्षीही आयुक्तांनी कोरोना प्रादुर्भावाबाबत नाशिककरांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला होता. नाशिक शहरातील कोरोना बाबत मनपाच्या वतीने केल्या जात असणाऱ्या विविध उपाययोजना, प्रत्येकांनी घ्यावयाची काळजी, याविषयी आयुक्त संवाद साधणार आहेत. तरी नागरिकांनी या फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
खालील लिंकवर क्लिक करुन आपण सहभागी होऊ शकाल