नाशिक – शहरातील कोविड १९ची सद्यस्थिती आणि स्वच्छ भारत अभियानाविषयी महापालिका आयुक्त कैलास जाधव नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. येत्या बुधवारी (२८ ऑक्टोबर) रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. स्वच्छ भारत अभियान व कोरोना बाबत काही प्रश्न/सूचना असतील तर नक्कीच विचारु शकता, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होउन लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या संवादाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे