नाशिक – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र, ज्या व्यक्ती विनामास्क फिरतात त्यांच्यावर थेट १ हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. नाशिक महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. महापालिकेच्या पथकाने शहरात विविध ठिकाणी पहिल्याच दिवशी ५० हजाराचा दंड वसूल केला होता. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (२३ फेब्रुवारी) दिवसभरात महापालिकेच्या पथकाने तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आज दिवसभरात झालेली कारवाई अशी
नाशिक रोड
केसेस : २९ दंड : २९ हजार रुपये
नाशिक पश्चिम
केसेस : ११ दंड : ११ हजार रुपये
नाशिक पूर्व
केसेस : ४५ दंड : ४५ हजार रुपये
सिडको
केसेस : ११ दंड : ११ हजार रुपये
पंचवटी
केसेस : १६ दंड : १६ हजार रुपये
सातपूर
केसेस : १५ दंड : १५ हजार रुपये
एकूण
केसेस : १२७ दंड : १ लाख २७ हजार रुपये