फोरमच्या चेअरमनपदी डॉ. सचिन जाधव, को-चेअरमन पदी डॉ. श्रीपाद उपासनी, कन्वेनर डॉ. दिपक रावतोळे यांचेसोबत कार्यकारिणी सदस्य म्हणुन डॉ. अजित खालकर, डॉ. विशाल पगार, डॉ. आशिष हस्तक, डॉ अजय कापडणीस व डॉ शिल्पा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
“आयुर्वेद सर्जरी फोरम ” द्वारा जिल्हाभरातील सदस्यांच्या शल्यकर्म कौशल्याचा परिचय तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता प्रात्यक्षिक सहकार्य केले जाणार आहे. फोरम स्थापनेप्रसंगी निमा नाशिक च्या अध्यक्षा डॉ. जयश्री सुर्यवंशी, केंद्रिय सहकोषाध्यक्ष डॉ शैलेश निकम, राज्य सहसचिव डॉ अनिल निकम, निमा महाराष्ट्र प्रवक्ता डॉ तुषार सुर्यवंशी, डॉ देवेन्द्र बच्छाव, डाॅ. राहुल पगार, सचिव डॉ वैभव दातरंगे, खजिनदार डॉ प्रतिभा वाघ, संयोजक डॉ मनीष हिरे, उपाध्यक्षद्वये डॉ ललित जाधव व डॉ व्यंकटेश पाटील तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य हजर होते.