नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील कोविड आढावा बैठक सुरू आहे. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मुख्याधिकारी लीना बनसोड, सहायक पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, मनपा सहायक आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत खैरे, डॉ.अनंत पवार आदी उपस्थित आहेत.