नाशिक – राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या आखरित्याखालील मोठे,मध्यम व लघु प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्यातून आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षित करणेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषद मुख्याधिकारी लीना बनसोड, पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.