नाशिक – महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल संदर्भात कोणतीही सवलत न दिल्यामुळे सरकारच्या विरोधात सोमवारी शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वीज बिलांची होळी करण्यात आली. शहरातील रविवार कारंजा येथे झालेल्या आंदोलनात भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.प्रा.देवयानीताई फरांदे, शहराध्यक्ष गिरीष पालवे, मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी,नगरसेविका स्वाती भामरे, राजेंद्र महाले,महिला मंडल अध्यक्ष ललिता बिरारी, शिवा जाधव, मोहन गायधनी, संगीता जाधव आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपा द्वारका मंडलाच्या वतीने विजबिलाची होळी
भारतीय जनता पार्टी द्वारका मंडलाच्या वतीने महावितरण सबडीव्हीजन ऑफिस येथे वारे यांना निवेदन देण्यात आले्. यावेली वीज बिलाची होळी करुन, निषेध करण्यात आला. या प्रसंगी भाजपा द्वारका मंडल अध्यक्ष सुनील देसाई, नगरसेवक अजिंक्य साने, नगरसेवक संजय नवले, राम बडगुजर, गणेश ठाकूर, गिरीश जोशी, उदय जोशी, जितेंद्र चोरडिया,दीपक देव आदी उपस्थित होते..

सातपूर मंडळातही वीज बिलांची होळी
भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्यावतीने आज सातपूर मध्ये विविध ठिकाणी विज बिलातील सवलतीसाठी वीजबिल होळी जन आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले.