भाजपा कार्यालया समोर कुत्रे सोडने पडले महागात, गुन्हा दाखल
नाशिक : भाजपा कार्यालया समोर कुत्रे सोडून निषेध व्यक्त करणा-या शिवसेनेच्या युवासेना कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक दातीर,रूपेश पालकर,रमेश बर्वे,गणेश बर्वे,अमित बोरसे व पाच ते सहा कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी ललीत केदारे यांनी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास एनडीपटेल रोड भागात विना परवानगी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छेडले होते.
……
मनाई आदेशाचे उलंघन
नाशिक : पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणातून दोन टोळक्यांच्या वादात पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याची घटना नागसेननगर भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी चंद्रकांत गरूड (रा.नागसेननगर) या युवकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गरूड यांच्या मामांनी संशयीत संजय उर्फ चंकी मधुकर भालेराव,मिलींद उर्फ दुल्ली भालेराव,सचिन कैलास मोरे आदींविरोधात पोलीसात तक्रार दिल्याने सोमवारी (दि.१५) रात्री संशयीतांनी गरूड यांना चॉपरचा धाक दाखवत शिवीगाळ करीत खानदान संपविण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. तर प्रतिभा भालेराव यांनी दिलेल्या तक्रारी नुसार सचिन गरूड,सुजल राजेंद्र शिंदे व यश राजेंद्र शिंदे आदींनी भांडणाची कुरापत काढून कोयत्याचा धाक दाखवित घराबाहेर ये तुला संपवतो तसेच तुम्ही आमच्या मामाला मारतात का. असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच फेसबुकच्या माध्यमातून धमकी देवून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक आर.डी.सांगळे व हवालदार वाय.आर.शेख करीत आहेत.
……