नाशिक – भाजपा उद्योग आघाडीतर्फे वीज बिल वाढीबद्दल अंबड येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार, नाशिक शहर अध्यक्ष सतिश कोठारी, महिला अध्यक्षा सोनल दगडे, प्रभारी आशिष नहार, सहसंयोजक राजेंद्र आहिरे, सचिव वैभव चावक, खजिनदार एस. के. नायर, पावर कमिटीचे चेअरमन रविंद्रजी झोपे, इन्फाचे राजेंद्र कोठावदे, सौ. सुनंदा सोनवणे, श्रीमती जयश्री कुलकर्णी, सचिन कंकरेज, हेमंत काण्णव,देवेंद्र राणे, हरप्रित सिंग, विशाल माहिमकर व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीजेचे वाढीव बिले त्वरित रद्द करावी असे निवेदन सहा.अभियंता बोडके यांच्याकडे देण्यात आले. हे निवेदन शासनाकडे पाठवावे असेही यावेळी सांगण्यात आले.