नाशिक : भररस्त्यात मित्राचा वाढदिवस साजरा करणे तरुणांना चांगलेच महागात पडले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गर्दी गोळा करून काही तरुणांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत असून, याप्रकरणी सात तरुणांविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पेश कांडेकर,परेश नागपुरे,निलेश हिरे (रा.तिघे श्रमिकनगर),सतीश जाधव,विजय मोकळ (रा.सिडको),भूषण डोके (रा.डीजीपीनगर) व अनिलकुमार गुंजाळ (रा.नाशिकरोड) अशी संशयीत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रमेश वाघमारे यांनी तक्रार दाखल केली आहे. कांडेकर याचा नुकताच वाढदिवस पार पडला. २० ते २२ मार्च दरम्यान संशयीत तरुणांनी श्रमिकनगर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरातील राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या कार्यालया समोर सार्वजनिक मार्गावर गर्दी गोळा करून दुचाकीवर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी वाहतूकीस खोळंबा झाला होता. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
………