नाशिक – बनावट कागदपत्रांच्या आधारे नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीचे नियुक्तीपत्र देवून बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उमेश बबन उदावंत (रा. जेलरोड) असे या प्रकरणातील संशयिताचे नाव असून त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कोणतीही भरती नसतांना बनावट नियुक्तीपत्र, लोक आयुक्त यांचे पत्र व ओळख पत्र देऊन कामावर रुजू करण्याचा प्रयत्न या प्रकरणात करण्यात आला. मात्र अधिका-यांच्या खबरदारीने हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नसून बनावट कागदपत्र तयार करणा-याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशिक्षित बेरोजगारांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेतानाच या प्रकराणत शासनाचीही फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत बोगस कर्मचारी भरती करताना राजमुद्रेचा देखील गैरवापर झाला असून तत्कालिन मुख्याधिकारी डॉ. नरेश गिते व भूवनेश्वरी एस यांच्या बनावट स्वाक्ष-यांही करण्यात आल्या. या कागद पत्रांसह हितेंद्र मनोहर नायक व त्यांची पत्नी अक्षदा परमसिंह बटवाडा या जिल्हा परिषदेत रुजू करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही कागदपत्र तयार करणारा संशयित उमेश बबन उदावंत याच्या विरोधात जिल्हा परिषदेचे प्रभारी प्रशासन अधिकारी शिवाजी थेटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयितावर बनावट शासकीय कागद पत्र तयार करणे व फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

१८० बेरोजगारांची फसवणूक?
या प्रकरणात जवळपास १८० बेरोजगारांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे यात मोठी टोळी सक्रीय असल्याचा संशय व्यक्त होत आहे. बनावट कागजपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून देण्याच्या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने फसवणूक होणा-या तरुणांची सख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.