कट्टयासह एक जेरबंद
नाशिक: बेकायदेशीरपणे देशी कट्टा जवळ बाळगणार्या एकास भद्रकाली पोलीसांनी जेरबंद केले आहे. मोहम्मद अन्वर सय्यद (२६, रा. प्रज्ञानगर, नानावली) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ३२ हजाराचा एक देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीसांनी केलेल्या नाकाबंदीत मध्ये संशयित बेकायदेशीर रीत्या कट्टा जवळ बाळगताना आढळून आल्याने पोलीसांनी त्यास अटक केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक रमेश कोळी करत आहेत.
…..
रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू
नाशिक: धावत्या रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारा दरम्यान रविवारी मृत्यू झाला.ही घटना २६ मार्चला घडली होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास एकलहरा रेल्वे ट्रॅकसमोर १९२/७ ते १९२/९ दरम्यान एक अनोळखी व्यक्त रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याचे टॅ्रंकमॅन सतीश सोनवणे यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी जखमी व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून घोषीत केले. याप्रकरणी नाशिरोड पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.
……