सोमवार, ऑगस्ट 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – बुलेटच्या धडकेत पादचारी जखमी

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 13, 2020 | 1:31 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 2

बुलेटच्या धडकेत पादचारी जखमी
नाशिक – भरधाव बुलेटने दिलेल्या धडकेत पादचारी जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.९) विनयनगर बसस्टॉपजवळ घडली. याप्रकरणी विनयनगर येथील मिलिंद निकवाडे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चिंचोळे, अंबड येथील संशयित वृषभ राजेश शर्मा (२२) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद निकवाडे यांचे वडील यशवंत निकवाडे पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी वृषभ भरधाव वेगाने बुलेट घेवून आला. त्याने बुलेटची यशवंत निकवाडे यांना धडक दिली. त्यात ते जखमी झाले. पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करत आहेत.

…….

भिंत तोडण्यास विरोध केला म्हणून ठार मारण्याची धमकी
नाशिक – इमारत पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसतानाही भिंत तोडण्यास एकाने हटकले असता राग अनावर झाल्याने एकजणाने भिंत तोडण्यास विरोध केला तर ठार मारीन अशी धमकी दिल्याची घटना बुधवारी (दि.११) दुपारी ३ वाजेदरम्यान अजमेरी चौक, नाईकवाडीपुरा, भद्रकाली येथे घडली. याप्रकरणी आसिफ शेख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विनयनगर येथील संशयित जियिउद्दीन तैय्यब शेख (वय ३३) यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ शेख इमारतीजवळ गेले असता संशयित शेख गाळ्याला शटर लावून भिंत तोंडत असल्याचे दिसून आले. इमारत पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी फाईल दिली असून गाळ्याची भिंत तोडू नका. गाळ्याला शटर लावू नका. तुम्ही जर भिंत तोडली तर इमारत पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही. बांधकाम केल्यास दंड होईल, असे आसिफ शेख यांनी जियीउद्दीन शेख यास सांगितले. मात्र, जियीउद्दीन शेख याने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. तुला काय करायचे ते करुन घे, तू जर भिंत तोडण्यास विरोधा केला तर ठार मारील, अशी धमकी त्याने आसिफ शेख यांना दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहेत.

……

२० दिवस मुलीवर बलात्कार करणारा गजाआड
नाशिक – घरात कुणी नसल्याची खात्री करत एकाने मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी वैतागवाडी, म्हसरुळ येथील संशयितला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित घरात कुणी नसल्याची खात्री करुन पीडित मुलीच्या घरात घुसायचा. त्याने २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत मुलीवर वारंवार बलात्कार केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. भडीकर करत आहेत.

……

जाब विचारल्याने कानाचा घेतला लचका
नाशिक – भावजई व आईस शिवीगाळ व मारहाण केल्याचा जाब विचारणे एकाला चांगलेच महागात पडले. रागाच्या भरात एकाने दुसर्‍याच्या कानाचा लचका घेतल्याची घटना बुधवारी (दि.११) पांडे निवास, संगमेश्वर नगर, चेहडी पंपिंग, नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी चेहडी पंपिंग, नाशिकरोड येथील मधुकर विठोबा राव यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चेहडी पंपिंग, नाशिकरोड येथील पोलिसांनी संशयित यादव क्षिरसागर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत यादव क्षिरसागर याने मधुकर राव यांच्या भावजई व आईस शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी राव यांनी जाब विचारला असता राग अनावर झाल्याने क्षिरसागर याने त्यांचा उजव्या कानाचा लचका घेतला. तुला बघून घेतो, असे धमकी त्याने राव यांना दिली. पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. पी. उजागरे करत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कृषी योजनांची माहिती आता व्हॉटसअॅपवर; फक्त करा हा मेसेज

Next Post

कोविड -१९ च्या संकटकाळात गांधींचे तत्वज्ञान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

कोविड -१९ च्या संकटकाळात गांधींचे तत्वज्ञान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग…दोघांनी दुचाकीस्वारास केली बेदम मारहाण

ऑगस्ट 18, 2025
crime 112

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले….वेगवेगळया भागात राहणा-या तीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 18, 2025
rohit pawar

मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर रोहित पवार यांनी केला हा गंभीर आरोप….५ हजार कोटीच्या जमीनीचे प्रकरण आले चर्चेत

ऑगस्ट 18, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आढावा घेऊन प्रशासनाला दिल्या या सूचना

ऑगस्ट 18, 2025
4OKooSto 400x400

पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने दहा प्रश्नांची उत्तरे दिलीच नाही….योगेंद्र यादव यांची ही पोस्ट चर्चेत

ऑगस्ट 18, 2025
Eknath Shinde e1714057426383

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजना…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ऑगस्ट 18, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011