नाशिक : शहर व परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, बुधवारी (दि.२४) वेगवेगळय़ा भागात राहणा-या सात जणांनी आपले जीवन संपवले. त्यातील एकाने विषारी औषध सेवन करून तर उर्वरीतांनी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करणा-यांमध्ये एका अल्पवयीन मुलासह युवतीचा समावेश असून, कुठल्या वैफल्यातून सर्वांनी आत्महत्या केली. याचा शोध पोलीस घेत आहेत.
सिडकोतील औदूंबर बस थांबा भागात राहणाºया इश्वर भगवान वाडीले (४७) यांनी बुधवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ लेखानगर येथील सुविधा हॉस्पिटल येथे दाखल केले असता औषोधोपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीत घडली. सिध्दांत दीपक गायकवाड (१७ रा. धनराज रेसि.अंबड वजन काट्याजवळ) या अल्पवयीन मुलाने मंगळवारी (दि.२३) मध्यरात्री आपल्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. तिसरी घटना चुंचाळे शिवारात घडली. मोहन राजकुमार यादव (४० रा.घरकुल योजना,चुंचाळे) यांनी बुधवारी सकाळी आपल्या राहत्या घरात छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. तर लेखानगर येथील शॉपींग सेंटर भागात राहणारे भुषण राजेंद्र पवार (३० रा.खंडेराव चौक) यांनी मंगळवारी (दि.२३) रात्री आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये छताच्या कडीला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. या चारही मृतांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार शेख, जमादार जाधव,शेळके व हवालदार शेख करीत आहेत. तर पेठरोडवरील यजुर्वेदनगरी भागात राहणा-या गौरी सोमनाथ पवार (२२ रा.मेघराज बेकरी समोर) या युवतीने बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत. सातपूर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणा-या रोशन कौतीक काळे (३१ रा.शिवनेरी बंगला) यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये लोखंडी हुकला साडी बांधून गळाफास लावून आत्महत्या केली. पत्नी मोनाली काळे यांच्या खबरीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत. तर शिंदे गावातील नायगावरोड भागात राहणा-या विशाल चंद्रभान माळी (२२ रा.इंदिरानगर) या युवकाने आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भाऊ सागर माळी यांनी दिलेल्या खबरी वरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.