नाशिक – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस चालक – वाहक हे भाऊबीज निमित्त कामावर असतात. एकागावाहून दुस-या गावाला प्रवाशांना नेतांना त्यांना घरी जाता येत नाही. त्यामुळे त्यांची भाऊबीज हे बसच्या प्रवासात असते. त्यांना ती साजरी करता येत नाही. पण, आज नाशिक सीबीएस स्थानकावर नाशिक १ आगाराच्या महिला कर्मचारी यांनी कामगिरीवर असणाऱ्या चालक – वाहक यांना ओवाळून एक आगळी वेगळी भाऊबीज साजरी केली. या प्रसंगी बस स्थानकावर विभाग नियंत्रक नितीन मैंद, यंत्र अभियंता मुकुंद कुवर, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील व आगार व्यवस्थापक दिलीप नलावडे हजर होते.