नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर परिसरातील उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणाहून ४२ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले. याप्रकरणी प्रवीणकुमार नानकचंद चौहाण यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळी मंदिराकडून जत्रा हॉटेलकडे जाणार्या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. चोरट्याने पोल क्रमांक ३० ते १२ दरम्यान असलेले २०० वॅट क्षमतेचे एलईडी लाइट, ३ सीचॅनल, थ्री कोर केबल सॉकेट होल्डर, वेल्डींग मशीनची केबळ असा एकूण ४२ हजार ६०० रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. पुढील तपास पोलीस हवालदार वाढवणे तपास करत आहेत.