नाशिक : बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आनंद प्रकाश कांबळे (रा. शरणपुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आनंद कांबळे हा तीन ते चार वर्षांपासून पीडितेला बदनामी करण्यासह पती आणि मुलांना मारण्याची धमकी देवून शारिरीक संबंध ठेवत होता. पीडितेने त्यास नकार दिल्याने कांबळे याने पीडितेला बेथेलनगर येथे मारहाण व शिवीगाळ करत धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन कांबळे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…….
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार, चाकुने हल्ला
नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे एकाने तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना वैशाली नगर येथे घडली. याप्रकरणी धीरज मनोहर सकट (रा. वडारवाडी) याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन रोहित खंडू गांगुर्डे (रा. फुलेनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी धीरज हा पंचवटी मार्केटमधून शुक्रवारी (दि. २) रात्री साडेसातच्या सुमारास हमालीचे काम करून घरी जात होता. यावेळी तो वैशाली नगर येथे असताना संशयित रोहित गांगुर्डेने त्यास जवळ बोलून घेतले. त्यानंतर त्यांनी ‘दारु पाज किंवा दारू पिण्यासाठी पैसे दे’ अशी मागणी केली. पण, धीरजने नकार दिल्याने संशयितास त्याचा राग आला. त्यानी या रागातून धीरजवर चॉपरने तळहातावर वार करून खिशातून ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी सुध्दा दिली. त्यानंतर धीरजने पोलिस स्थानकात दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डंबाळे तपास करत आहे.