नाशिक : फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन, नाशिक च्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम , सामनगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. वृद्धाश्रमातील साठहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यांना आवश्यक औषधोपचार तसेच जीवनसत्वे व कॅल्शियमच्या गोळ्यांचे वितरण असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. याशिवाय साबण , टूथपेस्ट , कंगवे, खोबरेल तेल अशा दैनंदिन जीवनावश्यक वस्तू सर्व ज्येष्ठांना देण्यात आल्या. एफपीए च्या अध्यक्ष डॉ. सुनंदा भोकरे, सचिव डॉ. पंकज देवरे, माजी अध्यक्ष डॉ .प्रमोद आहेर, डॉ. मंजुषा दराडे, डॉ. मनीष पवार, डॉ. मंजुषा व्यवहारे, डॉ. प्रदीप गवळी, डॉ संध्या परदेशी, डॉ. विजय रुमाले, डॉ .श्रुती पालखेडकर, डॉ . दिव्या बदलानी, डॉ . सोमनाथ भोकरे आदींनी रुग्ण तपासणी केली. कार्यक्रम यशस्वितेसाठी मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष कांतीलाल चोपडा, व्यवस्थापक नामदेव थोरात आदी प्रयत्नशील होते.