मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – फाळके रोडवर दोघा मित्रांना टोळक्याकडून बेदम मारहाण

by India Darpan
फेब्रुवारी 4, 2021 | 9:42 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

टोळक्याकडून एकास मारहाण
नाशिक : घराकडे पायी जाणा-या दोघा मित्रांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना फाळके रोड भागात घडली. या घटनेत एकास दगड मारून फेकल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिफतेन खान,मुजीब खान,जुनेद खान व अन्य साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी परवेश मुक्तार काकर (१८ रा.रॉबिन बिस्कीट जवळ,बागवानपुरा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. काकर व त्याचा मित्र बुधवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास फाळके रोडने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. रस्त्यात भेटलेल्या वरिल टोळक्याने कुठलेही कारण नसतांना दोघा मित्रांना शिवीगाळ केली. यावेळी उपस्थितांनी वाद मिटविल्याने या घटनेवर पडदा पडला होता. मात्र दोघे मित्र पूढे जात असतांना संशयीतांनी जहागिर कब्रस्तान येथे पुन्हा गाठून दोघा मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत एकास दगड मारून फेकल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास जमादार इशी करीत आहेत.

…….

कारचालकास मारहाण
नाशिक : कट मारल्याच्या कारणातून टोळक्याने कारचालकास बेदम मारहाण केल्याची घटना जहांगिर कब्रस्तान भागात घडली. या घटनेत चालक जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज शेख,हरजोतसिंह ओबराई व त्यांचे दोन साथीदार अशी कारचालकास मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी वृंद विपूल पटेल (२० रा.दिंडोरीनाका) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पटेल बुधवारी (दि.३) फाळके रोडने आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. जहांगिर कब्रस्तान येथील अमीर लॉज परिसरात संशयीतांनी कार अडवून कट मारण्याच्या कारणातून वाद घातला. यावेळी संशयीतांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत पटेल यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत संशयीतांपैकी एकाने लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

……..

फळविक्रेत्याकडून कोयत्याने हल्ला
नाशिक : दुकानासमोर गाडा लावण्यास मनाई केल्याने संतप्त फळविक्रेत्याने एका व्यावसायीकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना दुर्गा गार्डन भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ ठाकूर असे संशयीत फळविक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी सलीम निजाम शेख (रा.भोरमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख यांचे महापालिका कार्यालय परिसरातील दुर्गा गार्डन भागात व्यवसाय आहे. बुधवारी (दि.३) ते आपल्या दुकानात बसलेले असतांना ही घटना घडली. संशयीताने आपला फळविक्रीचा हातगाडा शेख यांच्या दुकानासमोर लावल्याने त्यांनी त्यास गाडा हलविण्यास लावल्याने ही घटना घडली. दुकानासमोर हातगाडी लावू नको असे शेख यांनी बजावले असता संशयीताने शिवीगाळ करीत हातगाडीवरील कोयता घेवून शेख यांच्या पाठीवर वार केला. या घटनेत शेख जखमी झाले असून अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.

…….

महागडी सायकल चोरी
नाशिक : जेलरोड परिसरात भुरट्या चो-या वाढल्या असून सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली महागडी सायकल चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रंभाजी निरभवणे (रा.वसंत रजनी सोसा.सदगुरूनगर,पंचक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निरभवणे यांची डीएनएस कंपनीची महागडी सायकल गुरूवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
…

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतरत्न भीमसेन जोशी यांचा चरित्रपट पहायचाय? या लिंकवर क्लिक करा

Next Post

दिंडोरी तालुक्यातील  महिला सरपंच पदासाठी ५ फेब्रुवारीला आरक्षण सोडत 

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

दिंडोरी तालुक्यातील  महिला सरपंच पदासाठी ५ फेब्रुवारीला आरक्षण सोडत 

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011