नाशिक – सातपूर अंबड येथील ९० प्लेटिंग उद्योगाना आपले उत्पादन बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाने दिली होती. त्यानंतर गुरुवारी पाणी व वीज कट करण्याची कारवाई सुरु केली. पण, त्यास उद्योजकांनी विरोध झाल्यानंतर ही कारवाई टळली. खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उद्योजक व आधिकारीची बाजू समजून घेतली. त्यानंतर पालक मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मंत्रालात चक्रे फिरली व कारवाई टळली. महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाने कारवाईला सुरुवात केल्यानंतर उद्योजकानी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईने सातपूर अंबड मधिल सुमारे ९० प्लेटिंग उद्योगाना आपले उत्पादन बंद करावे लागले असते. पण, तूर्तास ही कारवाई टळल्यामुळे उद्योजकांनी सुस्कारा सोडला आहे.