नाशिक – महापालिकेच्या सहा प्रभागातील प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक सध्या होत आहे. मंगळवारी तीन सभापतींची बिनविरोध निवड झाली. तर उर्वरीत ३ प्रभाग समिती सभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच आहे. अवघ्या ६ महिन्यांसाठीच हे सभापती नियुक्त होणार आहेत.
बिनविरोध यांची निवड
नाशिक पूर्व – अॅड. श्याम बडाेदे (भाजप)
पंचवटी – शीतल माळोदे (भाजप)
सिडकाे – चंद्रकांत खाडे (शिवसेना)
—
येथे आहे चुरस
सातपूर – दीक्षा लोंढे (रिपाइं), रविंद्र धिवरे (भाजप), योगेश शेवरे (मनसे) यांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे शिवसेनेने रिपाइंला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दीक्षा लोंढे या सभापती होण्याची चिन्हे आहेत.
नाशिकरोड – येथे एकूण २३ नगरसेवक आहेत. शिवसेना व भाजपचे प्रत्येकी ११ तर राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे. भाजप-मीना हांडोरे, शिवसेना-जयश्री खर्जुल तर राष्ट्रवादी-जगदीश पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे सभापती कोण होणार हे मात्र अद्यापही अनिश्चित आहे.
नाशिक पश्चिम – येथे १२ नगरसेवक सदस्य आहेत. त्यात भाजपचे ५, शिवसेना, राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी १ तर काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. भाजपच्या स्वाती भामरे तर काँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे वैशाली भोसले या सभापती होण्याची शक्यता आहे.