नाशिक : महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये गेल्या ४८ तासात येथील दीडशे हून अधिक प्रशिक्षीणार्थी पोलिस कर्मचारी पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. या सर्वांना ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस उपअधिक्षक दर्जाच्या अधिका-यांना अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. दोन दिवसांपूर्वी येथील दोन प्रशिक्षीणार्थींना लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तपासणीअंती हा आकडा ११८ वर पोहचला. या सर्वांना बुधवारी उपचारासाठी ठक्कर डोम येथे हलविण्यात आले. गुरूवारी यात पुन्हा पन्नास पॉझिटीव्ह अहवालांची भर पडली. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून हा भाग प्रतिबंधित केलेला असताना येथे करोना प्रादुर्भाव झाला आहे. नियमात राहुनही कोरोनाचा मोठया प्रमाणावर फैलाव झाल्याने प्रशिक्षणार्थी अधिका-यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे.