नाशिक – महानगर पालिका समोर आंदोलन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्हयात आरोपी असलेल्या दीपक डोके यांना पीपीई किट घातलेल्या पोलीस पथकाने वैद्यकीय तपासणी करून रात्री ९ .२१ ला अटक केली. डोके यांच्याविरुध्द सरकारवाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 65 /21 IPC 304(ii),269,270 सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम ३ व ४ असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.