नाशिक – शहर पोलिसांनी मध्यरात्री राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला असून २५ जणांना अटक केली आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून यापुढील काळात अशा प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन अचानक होण्याची चिन्हे आहेत.
नासिक पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, शस्त्रांच्या शोधासाठी सराईतांसह गुन्हेगारी टोळ्याशी संबधित ३८ संशयितांच्या घरी बुधवारी रात्रभर राबविलेल्या कोबींग आॅपरेशन राबवित ३ गावठी कट्टे, ११ काडतुसे
८ तलवारी, १३ कोयते, ४ चॉपर, २ सुरे, १ फायचर १ हातोडा यासह ३६ घातक शस्त्र हस्तगत केली.
एकाचवेळी पंचवटी, मुंबई नाका, अंबड, उपनगर पोलिस ठाण्यात ही मोहीम राबविली.
पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, अमोल तांबे, विजय खरात,
पौर्णिमा चौगुले, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, प्रदीप जाधव, दिपाली खन्ना, अशोक नखाते आदीसह चारही
पोलिस ठाण्यातील ४० निरीक्षक, ८५ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५४३ पोलिस १२० महिला कर्मचारी एकाचवेळी
रस्त्यावर उतरले. संशयिताच्या घरी एकाचवेळी सगळ्यांनी छापे टाकून तपासणी करत मुसक्या आवळल्या.
पंचवटी ठाण्याच्या हद्दीत २ तलवारी, ३ कोयते, १सुरा, फायटर सापडले, मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत ३
तलवारी, ३ कोयते, १ चॉपर अंबड पोलिसांच्या हद्दीत १ गावठी कट्टा, १ काडतुसे, २ कोयते, ६ चॉपर,
१ हातोडा तर उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ तलवार, १ कोयता, फायटर अशी हत्यार शोधून काढली.
२५ जणांना अटक
पोलिसांनी या कारवाईत यश सतीष गरुड (नारायणबापूनगर), राहूल संदीप सोनवणे (जय भवानी रोड),
सौरभ लोंढे (गांधीधाम दे.गाव), सागर जाधव (विहीतगाव), गणेश शेषराव घुसळे, नागेश सोनवणे (उपेंद्रनगर),
दर्शन उत्तम दोंदे (कामटवाडे), जितेंद्र अशोक चौधरी, (सावतानगर), अल्ताफ अलीम सैय्यद , हरिष पोपट निकम
(पाटीलनगर सिडको), शुभम नामदेव पेंढारे, (पवनगर), हितेश रतन देवरे (साईबाबानगर), विशाल भगवान आढाव
(कालिकानगर), अजय जीवण बिऱ्हाडे, अमोल प्रकाश बाबर (म्हाडा कॉलनी) सद्दाम इब्राहीम शेख (भारतनगर),
लक्ष्मण पोपट घारे (क्रांतीनगर), शुभम सुभाष भामरे (कालिकानगर), शाम लक्ष्मण महाजन (हिरावाडी),
केतन अशोक थोरात (कमलनगर हिरावाडी), गोकुळ मधुकर येलमामे (फुलेनगर), रोशन केशव चव्हाण
(दिंडोरी रोड पंचवटी), किरण सुकलाल गुंजाळ (नवनाथनगर), पप्पू (प्रकाश) मोहन धोत्रे (पेठ रोड),
सुरज विक्रम परदेशी (हिरावाडी) अशा २५ जणांना अटक केली.