नाशिक – नांदेड येथे शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या शनिवारी झालेल्या वार्षिक अधिवेशनात नाशिक जिल्हा शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पवार यांची नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी(नाशिक, जळगाव, धूळ, नंदुरबार) सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल राजाध्यक्ष आलेगावकर साहेब, संतोष मलेवार, कमलाकर शेटे, बाजीराव देशमुख, अजय चव्हाण, दिपक पाटील, अजित न्यायनिर्गुणे, प्रकाश भिल्लारे व इतर सर्व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर निवड केल्याबद्दल सुनील पवार यांनी राज्याध्यक्ष व राज्य कार्यकारिणी चे आभार मानले.