नाशिक – निफाड तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत तीन ठिकाणी पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांचे पथकाची तीन ठिकाणी मटक्या अडयावर छापा टाकत शनिवारी कारवाई केली. या छाप्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करुन १ लाख १४ हजार ४३९ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.
पहिली कारवाई सायखेडा पो.स्टे. हद्दीत खेरवाडी गावात कल्याण मटका जुगार अड्यावर छापा टाकून ४ इसमाना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या कडून एकूण १२ हजार ४४९ रुपये. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जुगार मालक गणेश लक्कड, रा. रौलस पिंप्री, ता. निफाड याचे सह एकूण ४ इसमांवर सायखेडा पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई पिंपळगाव पो.स्टे. हद्दीत बेहद गावाकडे जाणाऱ्या रोड वर मिलन नावाचा मटका जुगार अड्यावर छापा टाकून ३ इसमाना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या कडून एकूण ४२ हजार ५६० रुपये. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जुगार मालक चंदन सुरडकर , रा. बेहड, ता. निफाड याचे सह एकूण ४ इसमांवर पिंपळगाव पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई पिंपळगाव पो.स्टे. हद्दीत खेडगाव रोड वरील पालखेड कळवा जवळील मटका जुगार अड्यावर छापा टाकून ४ इसमाना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या कडून एकूण ५९ हजार ४३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जुगार मालक मधुकर वणी, रा. शात्री नगर, पिंपळगाव, ता. निफाड याचे सह एकूण ५ इसमांवर पिंपळगाव पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.