नाशिक – नाशिक जिल्ह्यात व शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतांना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील विविध भागातील गर्दीच्या भागाची पाहणी केली. राणाप्रताप चौक, उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक सिडको, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड या ठिकाणी ते ही पाहणी करत आहे. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहे.