पत्नीला मारहाण करणार्या पतीवर गुन्हा
नाशिक : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून सातत्याने शिविगाळ व मारहाण करणार्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तफा मनियार शेख (रा. शरणपूर) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. १९) रोजी संशयित दारू पिऊन घरी आला व पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ केली व विट फेकून मारली. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हवालदार खैरनार तपास करत आहे.
……
महिलेस मारहाण करत विनयभंग
नाशिक : घरात लहान मुलांसह राहत असलेल्या महिलेच्या घरात घुसून एकाने मारहाण करत तिचा विनयभंग केला, तसेच संशयिताच्या आईनेही पीडितेस शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) सकाळी पेठरोड येथील सम्राट नगर परिसरात घडली. मंगेश मधुकर बागुल (३९) व विमल मधुकर बागुल (६५, रा. सम्राट नगर) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पीडितेने पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयितांनी शुक्रवारी सकाळी महिलेच्या घरात शिरुन विनयभंग व मारहाण केली. पीडितेच्या भावालाही संशयितांनी मारहाण केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अला आहे.

…….
अल्पवयीन युवतीवर अत्याचार
नाशिक : अल्पवयीन युवतीस लग्नाचे अमिष दाखवून शारिरीक अत्याचार करून नंतर लग्नास नकार देत अश्लिल फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्याविरुद्ध बलात्कार व पोस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे.
मजर युसूफ शेख बागवाण (रा. उपनगर) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन आणि आंतरजातीय असल्याचे माहिती असूनही संशयिताने तिला लग्नाचे अमिष दाखवून २०१४ पासून वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. तर लग्नास नकार देत शिविगाळ व मारहाण केली. तसेच अश्लिल फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यास वडीलांच्या मोबाइलवर पाठवून देण्याची देण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त समीर शेख तपास करत आहे.