नाशिक – शहर पोलिसांनी पंचवटीतील सराईत विनायक उर्फ दीपक उर्फ झगड्या लाटे (वय २७, पाथरवट लेन पंचवटी) याला एमपीडीए कायद्यार्तंगत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशानुसार एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. सराईत झगड्या लाटे याची पंचवटीत मोठी दहशत आहे. रामकुंड, काळाराम मंदीर, वाल्मीनगर, गणेशवाडी, फुलेनगर, भाजीमार्केट परिसरात शस्त्रांच्या धाकाने अनेकांना लूटल्याचे त्याच्यावर गुन्हे आहेत. अनेकांवर त्याने गंभीर वार केले आहेत. पंचवटी परिसरात दहशत निर्माण करण्यासह लोकांना मारझोड करीत, त्या भागातील शांतता भंग करुन कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करण्याच्या त्या प्रवृत्तीमुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.