ओझर: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवार २९ मार्च पासून पुढील आदेश येईपर्यंत कोर्ट कामकाजाची वेळ सकाळी ११ ते १.३० प्रथम सत्रात व २ ते ४.३० दुसऱ्या सत्रात राहील. सर्व जजेस दोन्ही सत्रात डायस वर हजर राहतील मात्र कोर्टातील कर्मचारी पन्नास टक्के हजर राहतील. ज्यांचे काम चालणार असेल त्याच वकील व पक्षकारांना कोर्ट हॉल मध्ये बसता येईल. तसेच एखादा पक्षकार किंवा वकील एखाद्या प्रकरणात हजर राहिला नाही, तर त्याच्या विरोधात ऑर्डर केली जाणार नाही. मास्क,फिजिकल डिस्टनसिंग व सॅनिटायझर चे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. पहिल्या सत्रात पुरावा घेण्याचे काम प्राधान्याने होईल दुसऱ्या सत्रात वकिलांचे युक्तिवाद जजमेंट व इतर कामे होतील. कामाशिवाय वकील व पक्षकार यांनी कोर्टात गर्दी करू नये
असे हायकोर्ट समनव्य समिती व न्यायाधीश यांनी सध्याची कोविडची परिस्थिती बघता काढले आहे हे परिपत्रक महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुका न्यायालयांना लागू राहणार राहणार असल्याची माहिती नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी दिली.